आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नसराईचा सीझन सुरू झाला आहे. कॅटरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अंकिता आणि विकी जैन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता आणि विकी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे अंकिताच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.