Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Unnad- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा जिंकल्यानंतर, 2023 च्या उन्हाळ्यात जिओ स्टुडिओजचा ‘उनाड’ चित्रपट सिनेमागृहात झळकणार

unnad
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (15:55 IST)
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहुचर्चित व प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा चित्रपट  ‘उनाड’
उन्हाळ्यात २०२३ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित ‘उनाड’ चित्रपट तरूणांवर चित्रीत असून आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
 
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, “ ‘उनाड’ हा चित्रपट तरूणांवर चित्रीत करण्यात आला असून हा चित्रपट पुढील वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपट युवकांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल अशी मला आशा आहे.”
 
चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे झालेल्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival) युवा विभागातील फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘उनाड’ची  नुकतीच निवड झाली.
 
‘उनाड’ही महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील हर्णे येथील मासेमारी करणाऱ्या तीन युवकांची कथा आहे. शुभ्या, बंड्या व जमील हे तीन कोणतेही ध्येय नसलेले मित्र गावात दिवसभर हुंदडतात. गावातील सर्व स्थानिक त्यांना उनाड समजत असल्याने, तिघेही अडचणीत सापडतात. त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यातील ही कहाणी आहे जी त्यांना कायमची बदलते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Spider Man No Way Home: स्पायडर मॅन नो वे होम' नव्या फुटेजसह चित्रपटगृहात परत येत आहे, रिलीजची तारीख जाणून घ्या