Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Spider Man No Way Home: स्पायडर मॅन नो वे होम' नव्या फुटेजसह चित्रपटगृहात परत येत आहे, रिलीजची तारीख जाणून घ्या

Spider Man No Way Home: स्पायडर मॅन नो वे होम' नव्या फुटेजसह चित्रपटगृहात परत येत आहे, रिलीजची तारीख जाणून घ्या
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (14:38 IST)
हॉलिवूडची प्रसिद्ध फ्रँचायझी 'स्पायडर-मॅन'चा 'स्पायडर-मॅन नो वे होम' हा चित्रपट गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि येताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटगृहांवर दीर्घकाळ राज्य करत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा एकदा भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, जी चाहत्यांसाठी मेजवानीपेक्षा कमी नाही. 
 
वास्तविक, 'स्पायडर-मॅन: नो वे होम'च्या यशानंतर, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटने हा चित्रपट पुन्हा एकदा भारतात प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. गंमत म्हणजे यावेळी हा ब्लॉकबस्टर सुपरहिरो चित्रपट अधिक फुटेजसह थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट 2 सप्टेंबरला हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशपांडे मी आहे