मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ आणि ख्यातनाम अभिनेते अतुल कुलकर्णी 'द सवाईकर केस'मधून वूट या वेबचॅनलवर पदार्पण करत आहेत. अप्रतिम परफॉर्मन्स आणि कलाकारीसाठी ओळखले जाणारे कुलकर्णी यांनी अनेक भाषांमध्ये आजवर काम केले आहे. आता ते एका वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसोर येणार आहेत.
हिंदी आणि मराठी चित्रसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे. मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम आणि आघाडीचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या फॅमिली थ्रिलरचे दिग्दर्शन करणार आहेत.
वूटची निर्मिती असलेल्या 'द सवाईकर केस'ची कथा गोव्यात घडते. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या सिरीजचे काम सुरू होईल. याबद्दल बोलताना प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणाले, 'द सवाईकर केसमध्ये काम करणे हा फारच छान अनुभव आहे.
हे कथानक अत्यंत रंजक आहे आणि अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. मला नेहमीच चौकटीबाहेरच्या व अनोख्या भूमिका करायच्या होत्या आणि 'द सवाईकर केस'मधील माझ्या व्यकितरेखाला स्वतःचे असे काही पैलू आहेत, जे मी साकारण्याचा प्रयत्न करणार