Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाळेच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा 'बॅक टू स्कुल'

शाळेच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा 'बॅक टू स्कुल'
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (14:38 IST)
सरकारने अनलॉकची घोषणा केली आणि मनोरंजनसष्टीमध्ये सगळ्यांना नवा हुरूप आला. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी थांबले होते. आता अनलॉकमुळे सर्व नवीन चित्रपटांच्या घोषणा आणि पूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन हळूहळू सुरु होत आहे. 
 
त्यातलाच एका मराठी सिनेमा म्हणजे 'बॅक टू स्कुल'. या नवीन चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा नावाप्रमाणे सर्व प्रेक्षकांना त्यांच्या शालेय दिवसांत घेऊन जाणार हे नक्की. प्रत्येक जण त्याच्या शालेय जीवनात अनेक अविस्मरणीय गोष्टी करत असतो. त्याच आठवणींना पुन्हा ताजे करण्यासाठी येतोय, 'बॅक टू स्कुल' हा नवाकोरा सिनेमा. 
 
रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या 'बॅक टू स्कुल' या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रंगसंस्कार प्रॉडक्शन हाऊसने यापूर्वी 'रामप्रहर' नावाचा सिनेमा केला असून तो २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अग्गं बाई, सासूबाई! च्या आगामी भागात; आसावरी अनुभवतेय तिच्या पहिल्या कमाईचा आनंद!