30 जून रोजी प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट जात आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यात दमदार कमाई केली आहे. आता पर्यंत या चित्रपटाने तब्बल 50 कोटींच्या पुढं कमाई केली आहे.
बाईपण भारी देवा हा चित्रपट 6 बहिणीची गोष्ट आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या या काकडे बहिणींची ही गोष्ट आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहे.
सध्या या चित्रपटाची एकूण कमाई 54 कोटींच्या घरात गेली आहे. या पूर्वी सैराट ने 85 कोटींची कमाई केली होती तर वेड या चित्रपटाने 75 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट आता कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार हे बघण्यासारखे आहे.