Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बकेट लिस्ट' 25 मे रीलिज होणार

baket list
, मंगळवार, 3 एप्रिल 2018 (17:07 IST)
माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या रीलिजचा मुहूर्त अखेर ठरला आहे. माधुरीची मुख्य भूमिका असलेला 'बकेट लिस्ट' 25 मे रोजी प्रदर्शित होत आहे. तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं नवीन पोस्टर आणि रीलिजिंग डेट प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे करण जोहरनेही मराठीमध्ये ट्वीट केलं आहे. 'चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली' असं करणने म्हटलं आहे. बकेट लिस्ट'मध्ये माधुरी एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज येतो. 'माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्करलेल्या धोक्याची किंमत चुकवावी लागली