बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन लवकरच सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासोबत एका तेलुगु चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटामधील अमिताभ यांचा पहिला लुक सध्या व्हायरल होत आहे. अभिनेता चिरंजीवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अमिताभ केवळ कॅमियो रोल (गेस्ट रोल)मध्ये दिसणार आहेत. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक यु नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे.
अमिताभ यांनी ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे. त्यासोबत त्यांनी चित्रपटातील त्यांचा लुक शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे अमिताभ यांचा हा देखील हटके रोल असल्याचे फोटोवरून दिसत आहे. लांब केस आणि दाढीतील अमिताभ यांचा हा फोटो पाहिल्यानंतर एक गंभीर व्यक्तीरेखा साकारत असल्याचे दिसते.