Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

Baloch : ’बलोच'चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत

Baloch marathi movie
, गुरूवार, 15 जुलै 2021 (18:49 IST)
इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. 
 
पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून यात प्रवीण विठ्ठल तरडे यांची मुख्य भूमिका आहे.  विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे. 
 
प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारा आहे. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने अमेझॉन प्राईम व्हिडियो प्रदर्शित करणार ‘शेरशाह’; कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट!