बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय दुधाणे वर 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.
जय ने एका मालमत्त्याची बनावट कागदपत्रे तयार करून अनेक लोकांना विकल्याचे आरोप आहे.
ठाणे पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. जयचे लग्न 10 दिवसांपूर्वी झाले आहे. लग्नानन्तर त्याला अटक केल्यावर मनोरंजन श्रुष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जयच्या कुटुंबातील सदस्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयने बनावट कागदपत्रे बनवून त्याची दुकान लोकांना विकली. जयने हा व्यवहार बेकायदेशीरपणे केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी जयला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
जय दुधाणे हा बिग बॉस मराठी 3च्या शोमधून घराघरात पोहोचला.याशिवाय स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होते. मात्र काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.