Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत

Popular influencer Atharva Sudame in trouble
PHOTO-Atharva sudame facebook 
आपल्या विनोदी रील ने चाहत्यांची पंसती मिळवणाऱ्या प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन मंडळाकडून अथर्व यांना पीएमपीच्या बसमध्ये विना परवानगी चित्रीकरण करण्यासाठी आणि महामंडळाच्या साहित्यांचा वापर केल्याप्रकणी पुणे महानगर मंडळाकडून नोटीस देण्यात आली असून अथर्वला सात दिवसांच्या आत खुलासा देण्याचे सांगितले आहे. 
अथर्व ने रील बनवण्यासाठी बसमध्ये चित्रीकरण करताना महामंडळाच्या अधिकृत गणवेश, ई मशीन, बॅच बिल्ला यांचा विना परवानगी घेता वापर केला. या साठी अथर्वने कोणत्याही प्रकाराची लेखी परवानगी घेतलेली नव्हती.तसेच महिला प्रवाशांचे चित्रण अपमानास्पद पद्धतीने केले. या मुळे महिलांच्या सन्मानाला आणि मानसिक सुरक्षितेला बाधा पोहोचली आहे.  सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिलांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप पीएमपीने केला आहे.
ALSO READ: आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक
त्याला सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आक्षेपार्ह रील तत्काळ सोशल मीडियावरून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात सात दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ALSO READ: 'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'- रिंकू राजगुरूची 'आशा' १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
प्रतिबंध: भविष्यात परवानगीशिवाय पीएमपीच्या बसमध्ये किंवा साहित्यासह कोणतेही फोटो, व्हिडिओ प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धुरंधरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला: चौथ्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट बनला