अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत 04 जून 1947 झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.
मराठी सिनेसृष्टीतील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत.
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्यअभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.
त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. हे उत्तम अभिनेते असून आपल्या अभिनयातून दर्शवले आहे.