Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
, गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (11:10 IST)
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध त्यांच्या मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत वृत्तसंस्थेला माहिती दिली. 
 
मराठी चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्यांमध्ये लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी महेशविरुद्ध मुंबई न्यायालयात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या  ‘नई वरण भट लोंचा, कोन नई कोंचा’ या मराठी चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. याअंतर्गत पहिली तक्रार मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात तर दुसरी मुंबई सत्र न्यायालयात नोंदवण्यात आली आहे.
 
याशिवाय चित्रपट निर्मात्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांचा हा मराठी चित्रपट यावर्षी 14 जानेवारीला प्रदर्शित झाला.
 
प्रकरण काय आहे
भारतीय स्त्री शक्ती या मुंबईस्थित स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशपांडे यांनी तक्रार दाखल केली असून, चित्रपटात अल्पवयीन मुलांचे त्यांच्या आंटीसोबत लैंगिक संबंध असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. लहान मुलांसोबत हिंसाचाराची दृश्येही आहेत. चित्रपटातील संवाद अश्लील असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला होता. एनजीओने एफआयआर नोंदवण्यासाठी माहीम पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली होती. परंतु, काहीही होत नसल्याने देशपांडे यांनी पॉक्सो न्यायालयात याचिका दाखल केली.
 
याशिवाय क्षत्रिय मराठा सेवा संस्थेच्या वतीने वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदार वकील डीव्ही सरोज यांनी दावा केला होता की चित्रपटातील आशयामुळे समाजात वैमनस्य निर्माण होऊ शकते. दुसरी तक्रार पॉक्सो अंतर्गत सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. यामध्ये महेश आणि निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.
 
Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha हा चित्रपट दिवंगत जयंत पवार यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, छाया कदम, शशांक शेंडे आणि कश्मीरा शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी दोन किशोरवयीन मुले आहेत, जी वंचित आणि हिंसेला तोंड देत मोठे होतात आणि गुन्हेगार बनतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोचं कौतुक