Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टेंभी नाक्यावर धर्मवीर आनंद दिघे अवतरले

Prasad oak
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (12:56 IST)
social media
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे. हा सण उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही टेंभी नाक्यावर घटस्थापना करण्यात आली. या वर्षी देखील टेंभी  नाक्यावर देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मात्र यंदाचा नवरात्रोत्सव काही वेगळा झाला. या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी चक्क धर्मवीर आनंद दिघे हे अवतरले. त्यांनी देवीचं दर्शन घेतलं.आणि पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यांना आपल्या मध्ये पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे काही स्वप्न नसून अभिनेता प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघे यांची वेशभूषा घेऊन आलेला होता. 
 
अभिनेता प्रसाद ओक सध्या धर्मवीर पार्ट 2 मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून आनंद दिघेंच्या वेशभूषेत त्याने टेंभी नाक्यावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन आरती केली. त्याने दिघे यांची वेशभूषा हूबेहू केली असून त्याला तिथे पाहून लोक चक्रावले. काहींनी अभिनेत्याचे पायापासून आनंद दिघे म्हणून आशीर्वाद घेतले. आपल्या मध्ये अचानक धर्मवीर आनंद दिघेंना पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.  .
 
 


Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Falguni Pathak: फाल्गुनी पाठक नवरात्रीमध्ये करोडोंची कमाई करते, एका कार्यक्रमासाठी इतके पैसे घेते