Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांनी दिला ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरला आवाज

raj thakckeray shivaji
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (14:28 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या हटके भाषण शैली, सभा आणि कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच राज ठाकरे यांनी मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरमधून आपल्या दमदार आवाजाची मोहिनी प्रेक्षकांना घातली आहे. राज ठाकरे यांच्या आवाजातील हर हर महादेव चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमधील राज ठाकरेंच्या आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली आहे.
 
ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठीतील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर राज ठाकरे यांच्या भारदस्त आवाजात रेकॉर्ड करण्यात आलाय. सोशल मीडियावरही याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. “जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” ही राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tiger 3 Teaser:सलमान खान-कतरिनाचा 'टायगर 3' पुढील वर्षी ईदला येणार, टीझरमध्ये दबंग खानचा लूक