Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो--- अवधूत गुप्ते

avdhoot gupte
, शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (14:56 IST)
संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूत गुप्ते हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच अवधूत गुप्तेने राजकारणात येण्याची मोठी घोषणा केली आहे.

अवधूत गुप्ते हा गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या मंचावर झळकला होता. त्यामुळे तो लवकरच राजकारणात सक्रीय होऊ शकतो, याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता  वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्तेने याबद्दल घोषणा केली आहे.
 

अवधूत गुप्ते काय म्हणाला?
“मला कोणतीही निवडणूक आली की विचारणा होतेच. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो. कशासाठी राजकारणात यायचं किंवा कोण चांगलं राजकारण करु शकतं? ज्यांना स्वत:चं पोट भरायची भ्रांत नाही, तो चांगल राजकारण करु शकतो. आताची कर्तव्यांची इतिपूर्तता होईल. संसार, कुटुंबाप्रती असलेल्या जबबादाऱ्या संपलेल्या असतील, जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी मी राजकारणात येईन.

 २०१९ च्या आमदारकीपासून मी हे सगळं पाहतोय. त्यावेळी लोक माझ्या राजकारणात येण्यामागे माझा काही हेतू आहे अशी शंका घेऊ शकणार नाही. मलाही खात्री आहे की मी समाजकार्यासाठी म्हणून राजकारणात येईन. मी राजकारणासाठी प्रामाणिकपणे फक्त पाच वर्षच देईन. आपण घर साफ करतो, ती प्रत्येकाने आपली छोटीशी चौकट काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत बदलायला वेळ लागणार नाही. मी ज्या दिवशी येईन तेव्हा जाण्याचीही तारीख जाहीर करेन”, असे अवधूत गुप्तने म्हटले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke -अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज