जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. ते 93 वर्षांचे असून आज त्याांनी अखेरचा श्वास घेतल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारे समजते. मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती.
गोवा-हिंदू संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे नाट्यसेवा असून रायगडाला जहाँ जग ये सारख्या हिट नाटकात काम केले होते.
Edited by : Smita Joshi