Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

Nagnath Kottapalle
, गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (11:46 IST)
ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन झालं. त्यांचे वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 रोजी मुखेड जिल्हा नांदेड येथे झाला होता.
 
राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. ते 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
नागनाथ कोतापल्ले हे 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. 2005 पासून 2010 पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिसेप्शनच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू