Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवले पूल अपघाताला कारणीभूत ड्रायव्हर सापडला

webdunia
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (15:41 IST)
पुणे : नवले पुलाजवळ 48 वाहनांना धडक देणार्‍या ट्रक चालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात तेरा जण जखमी झाले होते. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या अपघातात 48 वाहनांचे नुकसान झाले आहे. ट्रक चालकाने उतारावर वाहन न्यूट्रल केल्याने अपघात घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. नवले पुलावर झालेल्या अपघाताची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. इंधन वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाने उतारावर वाहन न्यूट्रल केल्याने अपघात घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही.
 
कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले होते. ानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे. चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकात विद्यार्थ्याची आत्महत्या