Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मटण सूपमध्ये भाताचे कण बघून संतप्त ग्राहकांनी वेटरची हत्या केली, अन्य दोन कर्मचारी जखमी

pitai
, गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (12:52 IST)
पुणे शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाची दोन ग्राहकांनी हत्या केली. कारण इतकं क्षुल्लक होते की ग्राहकांना त्यांच्या मटण सूपमध्ये भाताचे कण पडलेले दिसले. या ग्राहकांनी सर्व्हिसच्या दर्जाबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही ग्राहक फरार आहेत. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेत हॉटेलमधील अन्य दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते. मटण सूपमध्ये भात सापडल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत मंगेश पोस्टे या 19 वर्षीय वेटरचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला.
 
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोकांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. विजय वाघिरे असे एका आरोपीचे नाव असून अन्य आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gujarat Election : काँग्रेसने 37 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली, शंकर सिंह वाघेला यांच्या मुलाला तिकीट