Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेबसिरीजचा आधार आणि ऑनलाईन केमिकल्स, श्रद्धा वालकर प्रकरणात काय काय माहिती समोर आलीय?

murder
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (23:12 IST)
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकणात आरोपी आफताब पुनावाला याच्या चौकशीत बरीच नवीन माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस मंगळवारी त्याला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले. आफताबने दाखवलेल्या जागांवर पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या मते, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
 
आफताबने 18 मे ला त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते आणि दिल्लीत राहत होते. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की आफताबने हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला होता. पोलीस आता त्या फोनचा शोध घेत आहेत.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता जेणेकरून लोकांना वाटेल की ती अद्याप जिवंत आहे.
मात्र ज्या शस्त्राने आफताबने तिच्या शरीराचे तुकडे केले ते शस्त्र अद्याप सापडलेलं नाही.
खून करण्यासाठी त्याने इंटरनेटवरून रसायनं मागवली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
आफताब ने 18 दिवस तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत राहिला.
हत्या करण्याच्या आधी त्याने डेक्स्टर ही वेबसिरीज पाहिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यात.
पोलीस आता आफताब आणि श्रद्धा यांच्या मित्रमैत्रिणीचीही चौकशी करत आहे.
श्रद्धाची हत्या केल्यानंतरही तो डेटिंग अप्सवर सक्रिय होता.
इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते तेव्हा त्याने दुसऱ्या मुलींना घरी डेटिंगसाठी बोलावलं होतं.

आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे?
श्रद्धा आणि आफताब एका डेटिंग अपच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.
2018 मध्ये श्रद्धा एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती.
श्रद्धा तिच्या आईबरोबर रहायची. तिचे वडील वेगळे राहत होते.
2019 मध्ये श्रद्धाने तिच्या आईला आफताब बद्दल सांगितलं आणि त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र धर्म वेगळा असल्याने आईने या प्रस्तावाला नकार दिला होता.
श्रद्धा नाराज होऊन घर सोडून गेली आणि आफताबसोबत राहू लागली.
काही दिवसानंतर आफताब श्रद्धाने तिच्या आईला सांगितलं की आफताब तिच्याबरोबर मारहाण करतो.
काही काळाने श्रद्धाच्या आईचं निधन झालं. तेव्हा श्रद्धाने ही सगळी हकिकत वडिलांना सांगितली. त्यांची भेट घेतली आणि आफताब बद्दल सांगितलं.

दोन महिने श्रद्धाशी काहीच संपर्क झाला नाही तेव्हा श्रद्धाच्या मित्राने ही माहिती तिच्या भावाला दिली. त्यानंतर पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.
मुंबई पोलिसांच्या तपासात तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन दिल्लीच्या मेहरोली भागात मिळालं होतं.
प्रकरण दिल्ली पोलिसांकडे गेलं आणि चौकशीची सुई आफताबकडे गेली.
पोलिसांनी सांगितलं की चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केल्याची कबुली दिली आहे.
लग्नाच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. 18 मे ला रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी एक फ्रीज खरेदी केला.
पोलिसांनी हा फ्रीज जप्त केला आहे.
मात्र ज्या शस्त्राने हत्या केली ते अद्याप मिळालेला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमदारच्या हेलिकॉप्टरमुळे म्हशीचा मृत्यू राजस्थान मधील घटना