Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ खडसेंचे कारनामे लवकरच बाहेर येतील ; मंत्री गिरीश महाजनांचा अल्टिमेटम

girish mahajan
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (21:38 IST)
राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत असून राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत सापडणार अश्या चर्चांना आता उधान आले आहे. गिरीश महाजन जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी खडसे यांच्यावर वक्तव्य केले असून आता याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
 
मंत्री महाजन म्हणाले,
“एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील. त्यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाय केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल. आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही.”
 
जिल्हा दुध संघात खुले आव्हान
जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आव्हन दिले. श्री. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले अवाहनही श्री. महाजन यांनी खडसे यांना दिले.
 
आधीच भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशीचा पुन्हा ससेमिरा खडसे यांच्या मागे लागला असतानाच आता गिरीश महाजन यांनी खडसे यांचे कारनामे बाहेर काढण्याची भाषा केल्याने त्यांच्या डोक्याचा ताण वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गृहपाठ न केल्याने शिक्षकाने इयत्ता तिसरीच्या मुलाला दिली भयानक शिक्षा, गुन्हा दाखल