Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारू पिता का?’ वरून अजित पवारांनी खडसावले..!

ajit pawar
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (20:58 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारला फटकारा मारत असतात, मागील काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्य चर्चेत राहिली असून त्यावरून आता अजित पवार यांनी सरकारला लक्ष केला असून यांना वेळीच आवरण्याचा इशारा दिला आहे. पवार म्हणाले,  मी दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय, लक्ष ठेवा असे अजित पवारांनी खडसावले आहे.
 
विरोधी पक्षनेते पवार म्हणाले,
“मी दिवाळीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. सध्या तुमच्या पक्षात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलेलं आहे. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलत आहेत. त्यातून सरकारची प्रतिमा खराब व्हायला मदत होते.”
 
सत्तारांचा समाचार
पुढे अजित पवार म्हणाले, “लोक ऐकत, पहात असतात. लक्षात ठेवत असतात, असं सांगितलं होत,
मंत्री काहीही वक्तव्य करतात चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे. नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात,” अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली.

सरकारवर टीकास्त्र
“मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार,” असा सवाल अजित पवार यांनी केला.

यंत्रणा दबावाखाली
“देशात चांगलं प्रशासन म्हणून ओळख आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग तणावाखाली काम करतोय. काल मी जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेलो. शहराध्यक्ष आनंद परांजपेंना भेटलो. अनेकांनी मला सांगितलं, पोलीस ऐकत नाहीत. पोलीस सांगतात, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही,” असे अजित पवार म्हणाले.
 
“मंत्रालयातील सचिव दर्जाचे, इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना सीएम ऑफिसमधून थेट आदेश येतात. सरकार चालवत असताना आदेश आल्यानंतर बजेट, अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या अशी प्रक्रिया असते. पण वरिष्ठांनी आदेश केलेलं काम ताबडतोब झाले पाहिजे, अशा सूचना असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही तणावाखाली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.”

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनची अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत, वेळीच तोडगा काढला नाही तर...