Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
, सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (11:48 IST)
सैराट, फ्रँडी, नाळ या सारखे यशस्वी चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या मनात आपले घर करणारे नागराज मंजुळे पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. यांच्या सैराट चित्रपटाने प्रचंड यश संपादित करून आपल्या प्रेक्षकांचे मन जिंकले होते. सैराटला प्रेक्षकांकडून भरभरून यश मिळाले होते. सैराट मध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे मुख्य भूमिकेत होते. या दोघांना देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते. आता नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ निर्मित चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'घर बंदूक बिरयानी' नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत तावडे यांनी लिहिलेले असून चित्रपटाला  ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे.येत्या पुढील वर्षी हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर ,नागराज मंजूर, आणि  सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.आकाश ठोसर यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे घर बंदूक बिरयानी चांगभलं म्हणत पोस्टर टाकले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्यन खानने कान पकडून एनसीबीला दिला हा शब्द