Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 February 2025
webdunia

२५ व्या चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'सांस्कृतिक कलादर्पण' पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर मु. पो. ठाणे' चित्रपटाला सर्वाधिक नामांकने

sanskruti kaladarpan
, गुरूवार, 6 एप्रिल 2023 (18:01 IST)
नाटक विभागात ‘सफरचंद’,मालिका विभागात ‘मुरांबा’आघाडीवर
पत्रकारिता विभागांतील नामांकने जाहीर झाली आहेत
 
मनोरंजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे चंद्रशेखर सांडवे प्रस्तुत 'संस्कृती कलादर्पण' पुरस्कार. गेली २५ वर्षे सातत्याने चित्रपट, नाटक, मालिका आणि विविध विभागांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'संस्कृती कलादर्पण २०२३' च्या नामांकनांसाठी मराठी मनोरंजन  क्षेत्रात सध्या चुरस रंगली असून हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असून, संस्थापक, अध्यक्ष चंदशेखर सांडवे यांनी या पुरस्कारांची नामांकने जाहीर केली आहेत.
 
सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनांमध्ये ताठ कणा (प्रज्ञा क्रिएशन), धर्मवीर मु. पो. ठाणे (झी स्टुडियो आणि साहिल मोशन), वाळवी (झी स्टुडियो आणि मयसभा), मदार (एम एम फॉरमेट फिल्म्स) आणि इंटरनॅशनल फालमफोक (धियो फिल्म्स) यांच्यात चुरस रंगलेली दिसत असून लक्षवेधी अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि लक्षवेधी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना 'आता वेळ झाली या चित्रपटासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. या पुरस्कार सोहळ्यात  'धर्मवीर मु. पो. ठाणे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, चित्रपट, संवाद, वेशभूषा, अभिनेता, गीतकार, रंगभूषा, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, सहाय्यक अभिनेत्री, पार्श्वसंगीत, पार्श्वगायक, संगीत, छायांकन अशी सर्वाधिक नामांकने असून 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, चित्रपट, अभिनेत्री, अभिनेता, सहाय्यक अभिनेता, दिग्दर्शक, संकलन अशा विविध विभागात नामांकने मिळाली आहेत. तर 'मदार' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, चित्रपट अभिनेत्री, अभिनेता, दिग्दर्शक, वेशभूषा, संकलन, छायांकन या विभागात नामांकने आहेत. 'इंटरनॅशनल फालमफोक' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा, चित्रपट, विनोदी कलावंत, संवाद, बालकलाकार, दिग्दर्शक विभागात नामांकने असून सर्वोत्कृष्ट कथा, वेशभूषा, बालकलाकार, रंगभूषा, लक्षवेधी चित्रपट, छायांकन हे नामांकने 'पिकासो'ला मिळाली आहेत. याव्यतिरिक्त  'झोलीवुड', 'दगडी चाळ २', 'ताठ कणा', 'पांडू', 'टाईमपास ३', 'समायरा', 'बालभारती', 'प्रेम प्रथा धूमशान', 'व्हराडी वाजंत्री', 'गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात', 'आतुर', 'बनी', 'सोंग्या', 'शहीद भाई कोतवाल', 'गिरकी' या चित्रपटांनाही विविध भागात नामांकने जाहीर झाली आहेत.
 
नाटक विभागात 'कुर्रर...' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, विनोदी अभिनेता, विनोदी अभिनेत्री, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, लेखक अशी सर्वाधिक नामांकने असून 'चर्चा तर होणारच', ' सफरचंद', 'वाकडी तिकडी', 'संगीत शोले', 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे', 'मधुरव', 'पुनश्च हनिमून', 'वारी', 'बाळाच्या आईचा घो', 'टेढे मेढे', 'हौस माझी पुरवा', 'वुमन' या नाटकांनाही विविध भागात नामांकने मिळाली आहेत. तर लक्षवेधी अभिनेता म्हणून संदेश कुलकर्णी (पुनश्च हनिमून) आणि लक्षवेधी अभिनेत्री म्हणून आदिती सारंगधर (चर्चा तर होणारच) यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मालिका विभागात 'मुलगी झाली हो', 'संत गजानन शेगावीचा', 'ठिपक्यांची रांगोळी', 'बॉस माझी लाडकी', 'मुरांबा', 'तुमची मुलगी काय करते' या मालिकांना नामांकने मिळाली आहेत. याव्यतिरिक्त पत्रकारिता विभागात सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदक, रिपोर्टर, यांचीही नामांकने जाहीर झाली आहेत.
 
 संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे म्हणतात, "महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या आणि कला क्षेत्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंतांना  प्रोत्साहन देण्याचे कार्य चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आले आहेत. आजवर अशा अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असून यावर्षीही कला क्षेत्रातील विविध विभागातील अशाच कलावंतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून लवकरच याचा निकालही आपल्यासमोर येईल.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘संत गजानन शेगावीचे’ महामालिकेत अभिनेते मनोज कोल्हटकर प्रमुख भूमिकेत