मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाची कहाणी आता चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार असून संघर्षयोद्धा असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्था करत आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे करत आहेत.दिग्दर्शन हे शिवाजी दौलताडे यांचे आहे. या चित्रपटात रोहन पाटील याने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे.
चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, हे प्रमुख भूमिका साकारत आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेला एल्गार या संघर्षयोद्धा चित्रपटातुन दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित झाला आहे.