Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

'सिटी ऑफ ड्रीम्स' मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री

Surprise entry
, बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (21:30 IST)
'सिटी ऑफ ड्रीम्सचा' पहिला सिझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सिझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत असून सोशल मिडीयावर प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतूनही त्याच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  
 
आदिनाथ कोठारे आपल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' मधील व्यक्तिरेखेविषयी म्हणतो, ''सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मॅसेजेस येत असून सोशल मिडीयावर त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.''
 
आदिनाथ आपल्याला ‘८३’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. '८३' हा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून माधुरी सोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. आदिनाथ दिग्दर्शित 'पाणी' या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bell Bottom Trailer: माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत लारा दत्तला ओळखणे कठीण आहे