90च्या दशकातील सप्तसुरांनी भरलेली सदाबहार गाणी आजही आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत. त्यावेळी चित्रपट गीत इतकच एक माध्यम संगीत प्रेमींसाठी होत पण आता मात्र चित्र बदल असून अनेक गीत स्वतंत्रपणे प्रेक्षकांच्या मनात घर करायला येतात असच एक गीत म्हणजे 'उगा गुंतले मी'… उगा गुंतले मी हे प्रेम गीत एका स्त्रीच्या मनातील आपल्या प्रियकरासाठीच भाव विश्व उलगडणार आहे. स्त्री जेव्हा केव्हा कोणावर प्रेम करते तेव्हा ते फार निरपेक्ष आणि प्रामाणिक असत. अशाच प्रामाणिक प्रेमाची गोष्ट या गाण्याच्या माध्यमातून जी.एम.सी ही युट्युब वाहिनी घेऊन आले आहे. सध्या सुरू असलेल्या मुरांबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारणारी सुवेधा देसाई- गावकर या गाण्यात प्रामुख्याने दिसत आहे. तर तिच्या सोबत आशिष कापसीकर या तरुण कलाकार प्रियकराच्या भूमिकेत दिसतो आहे.
90च्या दशकात प्रेमात पडलेल्या एका अल्लड मुलीच विश्व तिच्या प्रियकराभोवती कस फिरत असत आणि प्रेमात पडल्यावर त्याव्यक्ती मध्ये गुंतन काय असत याच चित्रण या गाण्यात केले आहे. कोकणच्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात या गाण्याचे चित्रीकरण झाले असून या गाण्याच्या निमित्ताने कोकण ही अनुभवायला मिळत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याच्या टिझरला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून या गाण्याचे दिग्दर्शन सागर गावकर याने केले आहे. तर गाण्याचे बोल विपुल शिवलकर याने लिहिले असून गाण्याला संगीतबद्ध अनुराग गोडबोले याने केले आहे. या अल्लड प्रेमाच्या गुंतन्याला लारीसा अलमेडा आणि अनुराग गोडबोले यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याच संकलन गुरू पाटील या तरूणाने केले असून नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी याने केले आहे.