तू तेव्हा तशी मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप
, रविवार, 26 मार्च 2023 (15:52 IST)
झी मराठीवरील मालिका तू तेव्हा तशी मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोरी आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ही मालिका बंद होण्याच्या बातम्या येत होत्या. मात्र हे सर्व अफवा असल्याचे समजले. अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते.मालिकेत पट्या आणि अनुची वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. घटस्फोट घेऊन वेगळी झालेली एका मुलीची स्वतःच्या पायावर उभी असलेली आई अनामिक अनु आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा पट्या या दोघांची अनोखी प्रेम कहाणी मालिकेत दिसली आता मालिका प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेत आहे. ही मालिका रात्री 8 वाजता प्राईम टाईमवर प्रसारित होत होती. नंतर मालिकेची वेळ बदलण्यात आली. या मालिकेत स्वप्नील जोशी , शिल्पा तुळसकर , सुहास जोशी, स्वानंद केतकर, अभिज्ञा भावे आणि रुमानी खरे हे मुख्य भूमिकेत झळकले.
पुढील लेख