Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tujhyat Jeev Rangala : तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे -जाधवचे अपघाती निधन

Tujhyat Jeev Rangala :  तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे -जाधवचे अपघाती निधन
, रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (15:54 IST)
Marathi Actress Kalyani Kurale Jadhav Passed Away: लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम कल्याणी कुरुळे जाधव या अभिनेत्रींचे रास्ता अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील हालोंडी सांगली फाटा येथे भरधाव येणाऱ्या डंपरची धडक लागल्याने तिचा मृत्यू झाला. 
 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिने नामवंत कलाकारांसह काम केले. दख्खनचा राजा या तिच्या लोकप्रिय मालिका आहेत. तिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाचे हॉटेल उघडले हॉटेल मधून बाहेर पडताना भरधाव डंपरने तिला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. कल्याणीने आठवड्यापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. तिने इंस्टाग्रामवर भाकऱ्या थापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर तिने छानसे कॅप्शन देखील लिहिले.

तिचे इंस्टावर सुमारे 3 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स आहे. तिच्या निधनाने मराठी सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे.  
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shahrukh Khan: विमानतळावर शाहरुख खानकडून कोणताही दंड घेण्यात आला नाही!