Publish Date: Mon, 16 Jan 2023 (17:17 IST)
Updated Date: Mon, 16 Jan 2023 (17:25 IST)
सध्या महाराष्ट्रभर वाळवीलागली असून प्रेक्षकांकडूनही या वाळवीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवीचित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या वाळवीचाच बोलबाला आहे. नुकतीच वाळवीच्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं.
या चित्रपटाची भुरळ सिनेसष्टीलाही पडली आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. वाळवीची खासियतही काही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकंदरच लाकूड पोखरणारी ही वाळवीसगळ्यांची मनं जिंकत आहे.
नुकताच वाळवीहा रहास्यपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित वाळवीहा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम चित्रपट आहे.
Published By -Smita Joshi