Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Cupसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर, 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार, 4 तिसऱ्यांदा खेळणार

World Cupसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर, 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार, 4 तिसऱ्यांदा खेळणार
, मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (14:34 IST)
कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, संजू सॅमसनला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळवला जाणार आहे. भारतीय संघ 2011 नंतरच्या विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहत आहे. 15 सदस्यीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, 6 खेळाडू असे आहेत जे प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. त्यात शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. अक्षर पटेल प्रथमच विश्वचषक सामना खेळू शकतो. तो 2015 मध्ये दाखल झालेल्या संघाचाही एक भाग होता, परंतु त्याला कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही. 4 खेळाडू 3 किंवा अधिक वेळा विश्वचषक खेळताना दिसतील. यामध्ये विराट कोहली सर्वात अनुभवी आहे.
 
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना विश्वचषकात गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय फलंदाजीची जबाबदारी शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि इशान किशन यांच्यावर असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगकर यांनी संघाची घोषणा केली
 
 विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असेल. वर्ल्डकपच्या बाबतीत तो टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने 2011, 2015 आणि 2019 चा विश्वचषकही खेळला आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटच्या वेळी विश्वचषक जिंकला होता. याशिवाय रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासाठी हा तिसरा विश्वचषक असेल. हे तिन्ही खेळाडू 2015 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मात्र, विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. इशान किशन आणि केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवही विश्वचषक संघात आहे. जरी त्याचा वनडे रेकॉर्ड काही खास नाही. 
 
 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण