आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला टीम इंडियाने स्थान दिले आहे. हे दोन्ही खेळाडू बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. राहुल मात्र हाताच्या दुखापतीने त्रस्त असून सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकणार आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अय्यर आणि राहुलच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांनी टीम इंडियालाही इशारा दिला आहे.
कपिल देव यांचे म्हणणे आहे की,आशियाकपच्या पूर्वी सर्व खेळाडूंची मैदानी चाचणी व्हायला हवी. कोणत्याही खेळाडूचा फिटनेस तपासण्यासाठी आशिया चषक ही सर्वोत्तम स्पर्धा असल्याचे विश्वचषक विजेत्याला वाटते. कपिल देव म्हणाले की विश्वचषक अगदी जवळ आला आहे आणि अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी व्हायला हवी.
दुखापतीतून परतल्या खेळाडूंसाठी ते म्हणाले, “सर्व खेळाडूंना अजून संधी मिळालेली नाही. तो थेट विश्वचषकात खेळला आणि पुन्हा जखमी झाला तर काय होईल याची कल्पना करू शकता का? यासाठी संपूर्ण टीम का सहन करणार.
ते म्हणले, खेळाडूंना आशिया चषक मध्ये कमी फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी असेल. यामुळे त्यांना पुन्हा लयीत येण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळेल. विश्वचषकादरम्यान कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर ती खूप वाईट गोष्ट असेल. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी आणि ते तंदुरुस्त असतील तर त्यांची विश्वचषकासाठी निवड करावी.
आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये आणखी चार श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच्यासोबत आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.