Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

webdunia
मंगळवार, 14 जुलै 2020 (12:01 IST)
मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांसोबत घरीच आहेत. इतकी दिवस घरीच राहिल्यामुळे त्यांच्या लूकमध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा असाच लॉकडाऊनमधील फोटो व्हायरल झाला होता. त्यात सफेद दाढी आणि केस पाहून नेटिझन्सनी धोनी म्हातारा झालाय, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यात आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचाही लॉकडाऊन लूक व्हायरल झाला आहे आणि त्याचा हा फोटो पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. 

मार्च महिन्यापासून कोहली मुंबईतील त्याच्या घरात पत्नी अनुष्कासोबत आहे. तो आणि अनुष्का सोशल मीडियावरून वारंवार चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. लॉकडाऊनमध्येही विराट त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे आणि व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ त्यानं पोस्ट केले आहेत. पण, लॉकडाऊन लूकमध्ये कोहलीची दाढी व केस खूपच वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि चाहत्यांनी त्याला हेअरकट करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका स्थगित करण्यात आली. तत्पूर्वी टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय मालिका झालेली नाही. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोहलीची फटकेबाजी पाहायला मिळणार होती, परंतु कोरोनामुळे आयपीएलही स्थगित करण्यात आली आहे. 
 


Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

आता लावा ही सवय