Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्यकुमारकडे टी-20 चे कर्णधारपद का सोपवण्यात आले, अजित आगरकर यांचा खुलासा

Ajit Agarkar
, सोमवार, 22 जुलै 2024 (15:24 IST)
टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियामध्ये बरेच बदल पाहायला मिळाले. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होताच T20 मध्ये कर्णधारपदाच्या पातळीवर बदल करण्यात आला. श्रीलन्का दौऱ्यासाठी सूर्यकुमारला कर्णधार बनवले आहे.

माजी क्रिकेटपटूंसह सोशल मीडियाने हा निर्णय संघासाठी योग्य नसल्याचे म्हटले. सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड का केली आहे. हे आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांनी स्पष्ट केले आहे. 

ते म्हणाले, सूर्यकुमारचे क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे. आम्हाला संघाच्या कर्णधाराची निवड करताना जो भविष्यात टीम इंडियासाठी जवळ जवळ सर्व सामने खेळेल असा कर्णधार निवडायचा होता. सूर्यकुमार यादव त्यासाठी योग्य आहे. असे आम्हाला वाटले. 

 तर पंड्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे असलेले कौशल्य शोधणे फार कठीण आहे. तथापि, त्याच्यासाठी फिटनेस खरोखरच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक, निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापनाला ते थोडे अवघड जाते.  हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. 
 पुढील T20 विश्वचषकापूर्वी आमच्याकडे बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला काही गोष्टी करून पहायच्या आहेत आणि परिस्थिती कशी वळते ते पाहू इच्छितो.

हार्दिकसाठी फिटनेस ही समस्या आहे. केवळ फिटनेसच नाही तर सूर्यकुमारमध्ये यशस्वी कर्णधार बनण्याची क्षमता आहे असे आम्हाला वाटते. दोन वर्षे खूप मोठा कालावधी आहे आणि या परिस्थितीत आपल्याकडे काहीतरी करून पाहण्याची वेळ आहे. जे खेळाडू आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहेत. या भूमिकेत आम्ही हार्दिकला अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असे आम्हाला वाटते. त्याने बॉल आणि बॅटने काय केले ते आपण या T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिले आहे. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी संघासाठी महत्त्वाची आहे, कर्णधारपदाचा मुद्दा नाही. या निर्णयासाठी आम्ही सर्व खेळाडूंशी बोललो.कर्णधारपदाचा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. याबद्दल खूप विचार केला गेला आणि नंतर सूर्यकुमार यादववची निवड केली गेली. 

Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

3 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले आजोबा थेट शिंदे सरकारच्या जाहिरातीत दिसले...