Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड

cricket
, शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (08:49 IST)
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली. MCA चा अध्यक्ष कोण होणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेतेमंडळींचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेले भारताच्या '1983 वर्ल्ड चॅम्पियन' संघातील माजी खेळाडू संदीप पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. अमोल काळे यांना १८३ मते मिळाली तर संदीप पाटील यांना १५० मते मिळाली.
 
संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षदासाठी उभे होते. पाटील यांच्याविरोधात शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटाने अमोल काळे यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले होते. त्यातच, शरद पवार आणि आशिष शेलार यांनी या बैठकीत काही गोष्टी सांगितल्या होत्या. संदीप पाटील यांचे व्याही भारताचे माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला आहेत. ते स्वत: मुंबईच्या निवड समितीवर आहेत. त्यामुळे संदीप पाटील अध्यक्ष झाल्यास परस्पर हितसंबंध जपले जातील, असा आरोप करण्यात आला होता. त्यातच शेवटच्या क्षणाला खेळच पालटला. अंकोला हे संदीप पाटील यांच्याबरोबर असतील असे वाटत असतानाच, सलिल अंकोला हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि संपूर्ण निवडणुकीलाच कलाटणी मिळाली.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार, आरोपीला अटक