श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५०० जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे थोडक्यात बचावला आहे. अनिल कुंबळे हा सुट्ट्यांसाठी श्रीलंकेमध्ये गेला होता.
अनिल कुंबळे ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला त्या शांग्री-ला या हॉटेलमध्ये राहत होता. पण याला नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी कुंबळे सकाळी ६ वाजता हॉटेलमधून निघाला. शांग्री-ला हॉटेलमध्ये सकाळी ८.४५ च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटांनंतर कुंबळे श्रीलंकेमधली सुट्टी अर्धवट सोडून भारतात परतला आहे. ही माहिती अनिल कुंबळेने ट्विटरवरून दिली आहे. याच हॉटेलमध्ये शुक्रवारी आम्ही नाश्ता केला होता, असं कुंबळे ट्विटरवर म्हणाला आहे.