Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Asia Cup: भारत आणि पाकिस्तान 10 सप्टेंबरला पुन्हा कोलंबोमध्ये आमनेसामने

Asia Cup: भारत आणि पाकिस्तान 10 सप्टेंबरला पुन्हा कोलंबोमध्ये आमनेसामने
, मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (18:07 IST)
Asia Cup:आशिया चषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 48.2 षटकात 230 धावा केल्या. यानंतर पावसामुळे बराच वेळ खेळ थांबला होता.
 
डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला 23 व्या षटकांत 145 धावांचे लक्ष मिळाले होते.   प्रत्युत्तरात भारताने 20.1 षटकांत 10 गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा 74 धावांवर नाबाद राहिला आणि शुभमन गिल 67 धावांवर नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडिया सुपर फोरमध्ये पोहोचली आहे. त्याचबरोबर नेपाळचा संघ आशिया चषकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.
 
अ गटातून पाकिस्तानने पहिले स्थान पटकावले आणि दुसरे स्थान मिळवून भारत सुपर फोरसाठी पात्र ठरला. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा सुपर फोरमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. सुपर फोर फेरी 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. याशिवाय भारतीय संघ सुपर फोरचा दुसरा सामना 12 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 15 सप्टेंबरला खेळणार आहे. हे दोन्ही सामने कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत.
 
 





Edited by - Priya Dixit    
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Table Tennis: पुरुष संघाचा आशियाई टेबल टेनिसमध्ये, सिंगापूरचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश