पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गेल्या आठवड्यात आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. या संघात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही ठेवण्यात आले होते. मात्र, तो स्पर्धेच्या अगोदरच जखमी झाला आणि त्याच्या खेळाबाबत शंका कायम आहे. शाहीनला या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध गुडघ्याला दुखापत झाली होती. तो अजूनही अनफिट आहे. त्याचवेळी 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. पाकिस्तान संघ 28 ऑगस्टला दुबईत भारताविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
शाहीन पाकिस्तान संघासोबत नेदरलँड दौऱ्यावर जात आहे. अलीकडेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला होता की संघाचे डॉक्टर आणि फिजिओ वेगवान गोलंदाजाची काळजी घेत आहेत आणि तो खेळतो की नाही याचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने यावर आपले मत मांडले असून शाहीनची भारताविरुद्ध किंवा आशिया चषकात अनुपस्थिती पाकिस्तानसाठी अडचणी निर्माण करू शकते, असे सांगितले आहे.