Publish Date: Mon, 16 Mar 2020 (15:26 IST)
Updated Date: Mon, 16 Mar 2020 (15:29 IST)
आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकणार्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजाने भारतीय तरुणीशी साखरपुडा केला आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूने दुसर्यांदा हा साखरपुडा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपली भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत भारतीय पद्धतीनुसार दुसर्यांदा साखरपुडा केला. याआधी 27 फेब्रुवारी रोजी त्याने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, साखरपुडा केला होता. आता त्याने भारतीय पद्धतीने विनीसोबत पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे.
मॅक्सवेलची गर्लफ्रेंड विनी रमनने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मॅक्सवेलन कुर्ता तर विनीने लेहेंगा परिधान केला आहे. मॅक्सवेलचा हा देसी अवतार भारतीय चाहत्यांना चांगला आवडला आहे.
याआधी मॅक्सवेलने मानसिक स्वास्थमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी त्याने, माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझा मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरे तर तिचे आभार मानले पाहिजेत, असे सांगितले होते. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठीणप्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.
webdunia
Publish Date: Mon, 16 Mar 2020 (15:26 IST)
Updated Date: Mon, 16 Mar 2020 (15:29 IST)