Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंचे वार्षिक करार जाहीर

बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंचे वार्षिक करार जाहीर
, गुरूवार, 8 मार्च 2018 (12:07 IST)

बीसीसीआयच्या प्रशासन समितीने क्रिकेटपटूंचे वार्षिक करार जाहीर केले. यामध्ये पुरुष खेळाडूंसाठी एक नवीन श्रेणी करण्यात आली असून, या ए प्लस श्रेणीत कर्णधार विराट कोहलीसह पाच खेळाडूंचा समावेश आहे. यातील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये रक्‍कम मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या श्रेणीत महेंद्रसिंग धोनी, रविचंद्रन अश्‍विन यांचा समावेश नाही. हे दोघे ए श्रेणीत असणार आहेत. या श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटींची रक्‍कम मिळणार आहे.धोनीचे डिमोशन तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे झाले असावे. याचप्रमाणे अश्विनही सध्या वन-डे संघात नाही त्यामुळे त्यालाही ए श्रेणीत घातले आहे.

बीसीसीआयकडून खेळाडूंना वार्षिक करार पद्धती राबवली जाते. पूर्वी ए, बी आणि सी अशा तीनच श्रेणीत खेळाडूंची वर्गवारी करण्यात येत होती. आता यामध्ये ए प्लस या नव्या श्रेणीची भर पडली आहे. या श्रेणीसाठी 7 कोटी रुपये वेतन असून यामध्ये कोहलीसह रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वरकुमार आणि जसप्रित बुमराह यांना स्थान मिळाले आहे. ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या काळासाठी हे करार असणार आहेत.

नवीन करार पुढील प्रमाणे : 

ए प्लस श्रेणी (7 कोटी रुपये) : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह.  

ए श्रेणी (5 कोटी रुपये) : रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, ऋद्धिमान साहा.

बी श्रेणी (3 कोटी रुपये) : के. एल. राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, दिनेश कार्तिक.  

सी श्रेणी (1 कोटी रुपये) : केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव.  

महिला खेळाडू ए श्रेणी (50 लाख रुपये) : मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर, स्मृती मंधाना.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नीट परीक्षेसाठी आधार सक्ती नाही