बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी ही घोषणा केली. अनिल कुंबळेचा बीसीसीआयसोबतचा करार जून 2017 पर्यंत आहे आणि त्याला पगारात वाढ हवी आहे.
कुंबळेला वर्षाला सुमारे 6.25 कोटी रुपये मिळतात असं म्हटलं जातं. आता त्यात 150 टक्के वाढ हवी आहे. कदाचित प्रशिक्षकाला एवढे पैसे देण्याची बोर्डाची इच्छा नाही. त्यामुळे त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी, बोर्ड विविध पर्यायांवर विचार करत आहे.