rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटच्या नेतृत्वाची ब्रायन लाराला भुरळ

brayan lara
हैदराबाद , सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (11:04 IST)
क्रिकेट विश्वातील एक महान फलंदाज व वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा हा भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वगुणांमुळे भारावून गेला आहे. विराट कोहली हा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेच, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्ट कर्णधार ही आहे, अशा शब्दांत लाराने विराटचे कौतुक केले आहे. 
 
क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त झालेला लारा आता गोल्फच्या मैदानात काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या हैदराबाद दौर्‍यावर असलेल्या लाराने कोहलीबद्दल त्याचे मत मांडले. कोहली हा खरोखरच एक सर्वोत्तम फलंदाज आहे. फलंदाजीची त्याची एक वेगळी स्टायल आहे. त्याचप्रमाणे नेतृत्तवाचाही त्याची स्वत:ची अशी शैली आहे, जी खूप परिणामकारक ठरते आहे असे लाराने म्हटले. मला एकाची दुसर्‍याशी तुलना करायची नाही किंवा कोणाचा क्रमही ठरवायचा नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिमोना हॅलेपला धक्का!