Publish Date: Mon, 06 Feb 2017 (10:57 IST)
Updated Date: Mon, 06 Feb 2017 (10:59 IST)
रूमानियाची महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे तिने सेंट पीटर्सबर्ग महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. या दुखापतीमुळे हॅलेपला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावी लागली होती. चौथ्या मानांकित सूमानियाने गेल्या आठवड्यात एॅना कोंजुवर विजय मिळविला पण या सामन्यावेळी तिला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. सेंट पीर्सबर्ग महिलांच्या टेनिस स्पर्धेत हॅलेपला मानांकनात टॉप सीडिंग देण्यात आले होते. पण दुखापतीमुळे तिने या र्स्पेतून माघार घेतल्याने तिच्या जागी रशियाची वाईल्ड कार्ड धारक नातालिया विखेलएनत्सेव्हाने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
webdunia
Publish Date: Mon, 06 Feb 2017 (10:57 IST)
Updated Date: Mon, 06 Feb 2017 (10:59 IST)