भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि झारखंडकडून खेळताना शतक झळकावले. मध्य प्रदेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून खेळताना ईशानने दमदार खेळी केली.
इशान किशनने संयमी खेळी खेळत 61 चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर 86 चेंडूत शतक पूर्ण केले. या काळात ईशानने 39 चेंडूत नऊ षटकार ठोकले. इशानच्या खेळीच्या जोरावरच झारखंडने मध्य प्रदेशविरुद्ध ताकद मिळवली आहे. इशान गेल्या वर्षीपर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग होता, परंतु 2023 हंगामाच्या शेवटी, त्याने सतत प्रवास केल्यामुळे विश्रांतीची मागणी केली होती. यानंतर ईशानला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. जूनमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकासाठीही त्याची संघात निवड झाली नव्हती.
इशान आणि श्रेयस अय्यर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये केंद्रीय करारातून वगळले होते कारण हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत लाल चेंडू स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.IPL 2024 मधून इशानने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्ससाठी 14 सामन्यांमध्ये एकूण 320 धावा केल्या, ज्यात एक अर्धशतक आहे.