Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा
, गुरूवार, 14 मे 2020 (05:25 IST)
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला आता मोठी शिक्षा होऊ शकते. कारण वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने याबाबत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने एक वक्तव्य केले होते, हे वक्तव्य आता गेलला भोवणार असल्याचे दिसत आहे.
 
गेल हा एक धडाकेबाज सलामीवीर आहे. पण गेल क्रिकेट व्यतीरीक्त बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो. गेलचे राहणीमानही थोडे वेगळे आहे. गेलला नेमक्या कोणत्या कारणास्तव संघातून काढण्यात आले, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. गेलला काही दिवसांपूर्वी एक जोरदार धक्का बसला होता. एका क्रिकेट लीगच्या संघातून गेलची हकालपट्टी करण्यात आली होती. आता गेलला या संघातून का काढण्यात आले, याचे कारण समोर आले आहे. गेलने आपल्याला वगळल्यासाठी माजी क्रिकेटपटूवर आरोप केले होते.
 
गेलने आपल्याला एका व्यक्तीच्या सांगण्यावरून संघातून काढून टाकले, असे म्हटले होते. या गोष्टीवर आता संघ मालकांनीच थेट खुलासा केला आहे. संघ मालकांनी एक पत्रक काढले असून त्यामध्ये आम्ही गेलला संघातून का काढले, हे सांगितले होते.
 
गेलने वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर आणि कॅरेबियन लीगमधील जमैका थलावा संघाचा सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सारवानमुळे काढले, असा धक्कादायक आरोप केला होता. त्यानंतर जमैका थलावा या संघांच्या मालकांनी यावर खुलास केला होता. सारवानच्या बोलण्यावरून नाही तर आम्ही हा निर्णय घेतल्याचे मालकांनी सांगितले होते. त्यानंतर गेलचे आरोप बिनबुडाचे होते, असे म्हटले गेले. त्यामुळे आता गेलला वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ शिक्षा करणार आहे.
 
याबाबत वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिकी रिस्कीट यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला गेल आणि लीगमधील काही व्यक्तींची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता यावर भाष्य करता येणार नाही. पण या प्रकरणामुळे गेलला मोठी शिक्षा होऊ शकते. पण गेलच्या आंतरराष्ट्रीय करीअरवर या गोष्टीचा मोठा फरक पडणार नाही. कारण गेलचे करीअर चांगले आहे आणि या प्रकरणाचा त्याचा करीअरवर परीणाम होऊ नये, असे आम्हाला वाटत आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली एकनाथ खडसे यांना ऑफर