Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेची इंग्लंडला पराभूत करून विजयी मालिका सुरू

South Africa
, शनिवार, 22 जून 2024 (08:31 IST)
सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यांनी ड गटातील त्यांचे चारही सामने जिंकले आणि आता सुपर एटमधील त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा पराभव केला होता.
 
क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडला एका रोमहर्षक सामन्यात सात धावांनी पराभूत करून सुपर एट टप्प्यात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या 65 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या, प्रत्युत्तरात ब्रूकने 37 चेंडूत 53 धावांची खेळी करत संघाला अडचणीतून सोडवले. त्याने आपली विकेट गमावली आणि इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या संघाला 20 षटकांत 6 बाद 156 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
 
दक्षिण आफ्रिकेने सध्याच्या टी-20 विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही . त्यांनी ड गटातील त्यांचे चारही सामने जिंकले आणि आता सुपर एटमधील त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा पराभव केला होता. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा बळकट झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांतून दोन विजयांसह चार गुणांसह गट दोनमध्ये अव्वल स्थानावर आहे. या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
 
हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आपले पाऊल टाकले आहे. आता तो उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
 
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीला आला. या काळात क्विंटन डी कॉकने संघाला चमकदार सुरुवात करून दिली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 163 धावा केल्या. यादरम्यान क्विंटन डी कॉकने 65 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि तब्बल षटकार मारले. डी कॉकशिवाय डेव्हिड मिलरने 28 चेंडूत 43 धावांच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याचबरोबर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ बळी घेतले. आदिल रशीद आणि मोईन अली यांच्या खात्यात 1-1 विकेट जमा झाली. 
 
164 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम झुंज दिली, मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 156 धावा करू शकला आणि 7 धावांनी सामना गमावला. 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia Ukraine War: कीव अमेरिकन शस्त्रांच्या मदतीने रशियात घुसून प्रत्युत्तर देणार