चाहत्यांनी धोनीचे भव्य मोझॅक पोर्टेटचे साकारले

येत्या ७ जुलैला कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे. या निमित्विताने विश्वविक्रमवीर चेतन राऊत आणि आबासाहेब शेवाळे या दोन तरुणांनी ठाण्यात कोरम मॉलमध्ये महेंद्रसिंग धोनीचे भव्य मोझॅक पोर्टेटचे साकारले आहे. बुद्धिबळाच्या सोंगट्यांपासून हे पोर्टेट तयार करण्यात आले आहे. येत्या १४ जुलै पर्यंन्त पोर्टेट प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात येणार  आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून चेतन आणि आबासाहेब या दोघांची यासाठी काम करत होती. सुमारे १ लाख ४१ हजार लाल, काळ्या, पांढ-या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या सांगट्यांचा वापर करून हे पोर्टेट तयार करण्यात आले आहे. पाेट्रेटची लांबी 30 फुट आणि रूंदी 20 फूट एवढी आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अखेर इस्राइल कंपनीने माफी मागितली