Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटचा विक्रम : सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठला

विराटचा विक्रम : सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठला
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने हे रेकॉर्ड केलं. या मॅचमध्ये विराटला २० हजार रनचा टप्पा गाठण्यासाठी विराटला ३७ रनची गरज होती. २० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो १२वा खेळाडू आणि तिसरा भारतीय आहे. विराटच्या नावावर वनडेमध्ये ११,१००पेक्षा जास्त रन तर टेस्टमध्ये ६ हजार ६१३ आणि टी-२० मध्ये २ हजार २६३ रन आहेत. सचिन आणि लाराने ४५३ इनिंगमध्ये २० हजार रन केले होते. तर कोहलीने ४१७व्या इनिंगमध्ये २० हजार रन पूर्ण केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दूध पिशवीची 50 पैसे रक्कम रोज परत केली जाणार