चौथ्या कसोटील फायनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरमशालाची खेळपट्टी वेगवान आणि चेंडूला उसळी देणारी असेल, असा अंदाज क्युरेटरांनी वर्तविला आहे. त्यापार्श्वभूमीवर फॉक्स स्पोर्टशी बोलताना जॉन्सन म्हणाला, धरमशालाचे मैदानफारच सुंदर आहे. येथील खेळपट्टीवर गवत दिसत आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा निश्चितच आत्मविश्वास वाढला असेल. पुण दुसरीकडे भारतीय खेळाडूंची चिंता वाढणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने अतिआत्मविश्वास वाळगला. त्याचा परिणाम दिसून आला. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे, यावरून सारे काही स्पष्ट होते.